संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्लीच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय परीक्षेत चमकदार कामगिरी!

232

एटापल्ली: विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथील पाच विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत आपले स्थान निश्चित केले आहे.

इयत्ता पाचवीतील विराट विजय सुंकेपाकवार, कु. आराध्या तुषार पवार, मंथन सुधाकर पुडो, शरविल नरेंद्र नागुलवार आणि इयत्ता आठवीतील कु. अक्षरा शोभन मुडमडीगेला यांनी परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. पूजा संस्कार आणि शाळेचे डायरेक्टर श्री. विजय संस्कार यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय श्री. नयन चौधरी सर, पालक तसेच शाळेतील सर्व शिक्षकांना दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले.

संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्लीचे विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत तसेच विविध स्पर्धांमध्ये नेहमीच उज्ज्वल यश मिळवत असतात. मागील वर्षी ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेतही संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्लीने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासन, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.