एटापल्ली: तालुक्यातील मौजा हालेवारा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्व समाजबांधवांच्या वतीने धुलीवंदन उत्सव साजरा करण्यात आला.
धुलीवंदन हा रंग आणि प्रेमाने नाते जपण्याचा सण आहे, जो संपूर्ण भारतभर विविध पद्धतीने साजरा केला जातो.
रंगांची उधळण करत पारंपरिक नृत्य, गाणी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सण साजरा करण्यात आला. समाजातील एकता आणि बंधुत्वाचा संदेश देत, सर्वांनी एकत्र येऊन जल्लोषात होळीचा आनंद घेतला.