मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
कार्यक्रमाचे अध्यक्ष सि आर पी एफ ०९बटालियन कमांडन्ट शंभू कुमार यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
आज दिनांक-08/03/2025 रोजी गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल आदिवासी बहुल जिल्हा म्हणुन ओळखला जातो. गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणाना वाव मिळावा या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन उप पोलीस स्टेशन दामरंचा च्या वतिने मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधिक्षक गडचिरोली, मा.श्री. यतिश देशमुख सा. अप्पर पोलास अधिक्षक ( आभियान) गडचिरोली मा. श्री. एम. रमेश सा. अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) गडचिरोली मा.श्री.सत्यसाई कार्तिक सा. अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी मा.श्री. शशिकांत दसुरकर सा. उपविभागीय पोलीस अधिकारी , जिमलगट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक-08/03/2025 रोजी जागतिक महिला दिनानिमीताने उप पोलीस स्टेशन दामरंचा येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यात उप पोस्टे दामरंचा हद्दीताल अंदाजे 175 ते 200 महिला व नागरीक उपस्थित होते.
सदर महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा. श्री.शंभु कुमार सा. कमांडन्ट (CRPF) 09 वी बटालियन अहेरी हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन श्रीमती किरणताई प्रमोद कोडापे (ग्रा.प. सरपंच दामरंचा), श्रीमती.पुष्पा वंजा गावडे (ग्रा.प. सदस्य कुरुमपल्ली) सरीता कंडलवार मॅडम, प्रियंका मॅडम(आरोग्य सेवीका पिएससी भंगारामपेठा),लक्ष्मिबाई सुरमवार ताई अंगनवाडी सेविका तसेच मा. श्री एल.एल. कोम सा.,मा. अविनाश सोनी सा. CRPF G 09 बटालीयन दामरंचा व पोउपनि-पृथ्वीराज बाराते सा.पोउपनि-अनिकेत सांकपाळ सा. श्रेणी पोउपनि- शंकर बावनथडे सा. पोउपनि- बसिने सा. SRPF गट क्र. 10 सोलापुर हे होते.
सदर मेळाव्यात अध्यक्ष व प्रमुख पाहुने यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले,राणी दुर्गावती यांच्या प्रतेमेला पुष्पहार घालुन दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरवात केली अध्यक्ष महोदयानी व प्रमुख पाहुण्याने महिलांप्रति क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षसाठी दिलेले योगदान तसेच स्त्रीयांचा लैंगीक समस्या व सुरक्षितते बाबत काळजी घेणे या विषयावर आरोग्यचे महत्व पठवुन दिले. तसेच मनापोशि- 5100 सुरेखा आत्राम यांनी माडीया भाषेत जागतिक महिला दिना विषयी भाषन केले व आपल्या आजची महिला कशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती करत आहेत त्याच प्रकारे उप पोलीस स्टेशन दामरंचा सारख्या आतिदुर्गम भागातील तरुणी व महिलांनी मागे न रहाता पोलीस भरती , इतर शासकीय नौकरी , लघु उद्योग यामध्ये महिलांनी पुढाकर घ्यावा या विषायावर मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच मा पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज बाराते सा.यांनी आपल्या विभागाच्या वतिने महिलांना न्याय, सम्मान, अधिकार मिळावा यासाठी सविधानात आसलेले कायद्याबाबत माहिती देण्यात आले. तसेच शासनाच्या विविध कल्यानकारी योजनाची माहिती सागण्यात आली. व उप पोस्टे दामरंचा व CRPF G 09 बटालीयन दामरंचा यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक-03/02/2025 ते 08/03/2025 रोजी पर्यंत सुरु असलेल्या शिवन कला प्रशिक्षण शिबिरचा समारोप करुन हद्दितील 20 महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. प्रमाण पत्र देण्यात आले.व महिला मेळाव्यासाठी उपस्थित महिलांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. 175 ते 200 नग साड्या,20 नग प्लास्टिक टोपली,20 नग प्लास्टीक बकिट 10 नग ताडपत्री ई. साहित्य वाटप करण्यात आले आरोग्य विभागाच्या वतीने स्टॉल लावुन उपस्थित असलेल्या 100 ते 150 महिलांची वैद्यकीय तपासनि करुन औषध गोळ्याचे वाटप करण्यत आले.कार्यक्रमाचे शेवटी नाष्टा व चहा पाण्याची उत्तम सोय करण्यात आली . कार्यक्रमाचे आभार प्रर्दशन मपोशि 5114 स्नेहा भांदककर यांनी केला.
सदर मेळावा शांततेत व योग्य बंदोबस्तात व्यवस्थितरित्या पारपाडण्या करिता उप पोलीस स्टेशन दामरंचा चे सर्व अधिकारी अंमलदार तसेच सिआरपीएफ चे अधिकारी अंमलदार , एसआरपीएफ चे अधिकारी अंमलदार यांनी मोलाचे योगदान दिले.