डॉ. सचिन कन्नाके यांना सामूहिक निरोप – दुर्गम भागात दिलेल्या उत्तम आरोग्य सेवेसाठी गौरव

169

एटापल्ली: तालुक्यात दुर्गम भागात उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणारे डॉ. सचिन कन्नाके यांना सामूहिक सन्मान आणि भावपूर्ण निरोप देण्यात आला. बुर्गी, गट्टा यांसारख्या दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या पुढील शिक्षणासाठी MD Paediatrics (बालरोगतज्ज्ञ) साठी सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे, यानिमित्ताने त्यांच्या सेवाकार्याचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरज जक्कुलवार, भाजपा तालुका महामंत्री मोहन नामेवार, माजी बांधकाम सभापती व नगरसेवक राघव सुलवावार (नगरपंचायत एटापल्ली), नगरसेवक राहुल कुळमेथे, शिवसेना (उबाठा) तालुका अध्यक्ष अक्षय पुंगाटी, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तेजस गुज्जलवार, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संपत पैडाकुलवार, तसेच शुभम वनमवार, धीरज सूनकेपाकवार, सुरज बावणे, अमित नाडमवार, सुमित नाडमवार, चिरंजीवी गड्डमवार, श्रीकांत तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

या वेळी डॉ. कन्नाके यांना शाल व पुस्तकं भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी कठीण परिस्थितीतही दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी समर्पित सेवा दिली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक नागरिकांना वेळेवर उपचार मिळाले, विशेषतः कोरोना काळात त्यांनी दिलेल्या योगदानाची सर्वांनी प्रशंसा केली.

उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, भावनिक निरोप दिल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. कन्नाके यांच्या योगदानामुळे एटापल्ली तालुका कायम ऋणी राहील, असे मत सर्वांनी व्यक्त केले.