विकास कामांच्या दृष्टीतून माजी जिल्हा परिषद अध्यक्षाचे आंदोलन!

41

आविसं, काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन…!

अहेरी : प्राणहीता रस्त्याचे व अहेरी वेंकटरावपेठा रस्त्याचे मंजूर काम तात्काळ पूर्ण करा.अन्यथा येत्या 28 फेब्रुवारीला आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आलापल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाला 17 फेब्रुवारीला निवेदन विनंती करताना दिला आहे.येथील नागरिकांना त्या रस्त्यातून तालुका मुख्यालयला येणे – जाणे करणे अडचणीचे ठरत आहे.

मात्र समंधित विभागनी निवेदनांची दाखल ना घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध लोकशाही मार्गाने उद्या 28 फेब्रुवारीला अजय कंकडालवार रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत आहे.तरी अहेरी विधानसभा क्षेत्रतील आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच येथील समस्त नागरिक आवर्जून उपस्थित राहण्याची आवाहन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.
वेळ : 10:30
स्थळ : अहेरी बायपास नाल्याजवळ