माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याहस्ते भगवान महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
एटापल्ली:-तालुक्यातील जारावंडी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते भगवान महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आले. यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,सरपंच सपना कोडापे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप दास, माजी जि.प.सदस्य श्रीनिवास दुलमवार,पेंढरीचे सरपंच पवन येरमे,उपसरपंच सुधाकर टेकाम, विकास कुमरे,मोहन नामेवार,अक्षय पुन्गाटी आदी उपस्थित होते.
२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने सगळीकडे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा दिसत होते.विविध मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी बघायला मिळाली.अश्यात जारावंडी परिसरातील नागरिकांनी मात्र स्वतःच्या गावातच भगवान महादेव मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते भगवान महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील केली. विशेष म्हणजे याठिकाणी भव्य मंदिर बांधकाम देखील केले जाणार असून राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंदिर बांधकामासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.लवकरच महादेव मंदिराचे बांधकाम केले जाणार असून पुढील वर्षी महाशिवरात्रीला हरहर महादेव जयघोषाने परिसर दुमदुमून जाणार आहे.
दरम्यान जारावंडी येथे राजेंचा आगमन होताच गावकऱ्यांनी त्यांचा जल्लोषात स्वागत केले.यावेळी जारावंडी परिसरातील महादेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*राजेंनी घेतली शिवलिंगाचे दर्शन*
गावात महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.तसेच गावकऱ्यांनी घेतलेल्या महादेव मंदिर बांधकामाच्या निर्णयाचे स्वागत केले.!