तिमरम येथे सरपंच सरोजा पेंदाम यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेश प्रमाणपत्राचे वाटप. — प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन महोत्सव सोहळा संपन्न.

54

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी: – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना पक्के घरकुल देण्याचे काम करीत आहे.
टप्पा दोन अन्वये ग्राम पंचायत तिमरम ला 145 घरकुल मंजूर झाले आहे.महायुती भाजप राज्य शासनाने 20 लक्ष घरकुल मंजूर केले असताना 10 लक्ष घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता देत आहे.
ग्राम विकास विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिप गडचिरोली अंतर्गत पंचायत समिती अहेरी ग्राम पंचायत तिमरम येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनचा महोत्सव सोहळ्या निमित्त 22 फेब्रुवारील ग्राम पंचायत भवनात झालेल्या घरकुल धारकांच्या सभेत सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.
या वेळी सरपंच सरोजा पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागुलवार,ग्राम पंचायत अधिकारी एस. एस. सडमेक, सदस्य श्रीकांत पेंदाम, महसूल सेवक महेश सडमेक,नरेंद्र सडमेक, सुरेश पोरतेठ,चंदू तलांडी व मंजूर घरकुल लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सभा यशस्वीतेकरिता ग्राम पंचायत कर्मचारी श्रीनिवास आईलवार, विलास मडावी,संगणक चालक तिरुपती डोंगरे आदी सहकार्य केले.