मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
गडचिरोली:-दिनांक १९/०२/२०२५ रोजी निस्वार्थ सेवा युवा ग्रुपच्या वतीने शिवजयंती आदिवासी परधान समाज मंदिर येथे “राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ,जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी”अशा घोषणांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते,ग्रुपचे सदस्य महेंद्र मसराम,अजय सुरपाम, बाळू गोवर्धन,विजय सुरपाम, तृपतराव मरसकोल्हे, रामचंद्र वाकडे,अनिकेत बांबोळे, गृहपाल सुरज शेडमाके, अजय काळे, यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर उपस्थीतांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी राजेश डोंगरे,आदिवासी परधान समाज मंडळाचे युवा सदस्य रुपेश सलामे, निस्वार्थ सेवा युवा ग्रुपचे सदस्य गणेश मेश्राम,नंदकिशोर कुंभारे, भावेश खोब्रागडे,अक्षय वलादे, राज डोंगरे, महादेव कांबळे,सचिन जेंगठे, अशोक नरोटे, नेहाल मेश्राम,रोहित सादूलवार,विवेक वाकडे, सौरभ मुप्पीडवार,प्रफुल विरगमवार,अवि शेंडे, शरद सोनकुसरे,अयफाज मन्सुरी, आकाश कुळमेथे,अंकुश बारसागडे, वैभव रामटेके,साहिल गोवर्धन, अंकित कुळमेथे,अजय सिडाम,साहिल शेडमाके,रोहित आत्राम, पंकज ठाकरे,शाबिर मन्सुरी, चक्रधर प्रधान,सुधीर मसराम,वॉर्डातील महिला शालू सुरपाम ,सुनिता मसराम, गंगा सलामे, यांचासह शहरातील ईतर नागरिक उपस्थीत होते.