लॉयडस मेटल कंपनी, सुरजागड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

37

सुरजागड, 19 फेब्रुवारी – लॉयडस मेटल कंपनी, सुरजागड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन हेडावू (खान प्रबंधक) होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गणेश रोही, गुलाटी आणि नायक यांची उपस्थिती होती. कंपनीतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जयंतीच्या निमित्ताने उपस्थित कामगारांना मिठाई वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि नेतृत्व गुणांचे स्मरण करून, त्यांचे विचार आपल्या कार्यप्रणालीत आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

लॉयडस मेटल कंपनी ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक एकता जपण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेत असते.