आरोग्य विभागाने काढून दिले ग्रामीण भागात आयुष्यमान कार्ड आरोग्य उपकेंद्र गुड्डीगुडम च्या वतीने निमलगुडम येथे आरोग्य तपासणी व आयुष्यमान कार्ड अभियान

65

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी
प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापुर अंतर्गत येत असलेल्या आरोग्य उपकेंद्र गुड्डीगुडम च्या वतीने निमलगुडम येथे आज रोजी गावातील नागरिकांचे आरोग्य तपासणी करून आयुष्यमान कार्ड काढून देण्याचे अभियान वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे.
ग्रामीण भागात शासकीय योजने पासून अनेक नागरिक दूर असतात याची दखल घेऊन निमलगुडम येथे गुड्डीगुडम उपकेंद्राचे पथक ठाण मांडून नागरिकांचे आरोग्य तपासणी करीत आवश्यक औषधे देत आयुष्यमान कार्ड काढून देत आयुष्यमान कार्डाचे महत्त्व व आवश्यकता यावर उदाहरणे देत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागात पाहिजे असे इंटरनेट नसताना सुद्धा गुड्डीगुडम येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी आपल्याकडील इंटरनेट संच वापरून ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा पुरविले यावेळी ४५ नगरिकांचे आरोग्य तपासणी करीत १७ नागरिकांचे आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिली. गुड्डीगुडम उप केंद्रात गुड्डीगुडम, तिमरम,गोलाकर्जी व निमलगुडम गावे येतात. तरी येथील अधिकारी व कर्मचारी वारंवार गृह भेटी देत आपले सेवा बजावतात. उपकेंद्रात चार गावे येत असल्याने सेवा सोयी पुरविण्यास अडचण जात असल्याने प्रसूती इमारत सह निवास व आरोग्य केंद्र एकाच इमारतीत आहे. त्यामुळे रुग्णांना जागा अपुरी होत असल्याने नवीन इमारत उपलब्ध करून देण्याचे मानस या वेळी उपस्थित नागरिक मागणी केली आहेत.
आयुष्यमान कार्ड व आरोग्य तपासणी कार्यक्रमात गुड्डीगुडम उप केंद्राचे आरोग्य अधिकारी रुचा बांते,आरोग्य अधिकारी रिचा श्रीवास्तव,परिचारिका मीनाक्षी निलीवार,आरोग्य अधिकारी नामदेव सडमेक,आशा सेविका महानंदा सडमेक, आरोग्य तपासणी अधिकारी सडमेक, आरटीवर्कर भिमय्या गदासवार,मदतनिस शशिकला रामगिरवार उपस्थित होते.