सुरजागड ठाकुरदेव यात्रेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लोकशाहीवादी तसेच डावे पक्षांची उपस्थिती

64

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

एटापल्ली, 5 ते 7 जानेवारी 2025 या काळात
सुरजागड येथे आयोजित पारंपरिक ठाकुरदेव यात्रेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) व इतर डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले. यात्रेच्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले.

यात्रेच्या निमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डावे पक्षांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा केली व त्यांच्या हक्कांसाठी एकजूट होण्याचा निर्धार व्यक्त केला. या यात्रेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. डॉ. महेश कोपुलवार, इलाका प्रमुख मा. सैनुजी गोटा, जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, अहेरी विधानसभा प्रमुख कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. अमोल मारकवार मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई रामदास जराते, ऍड लालसू नागोटी माजी जि प सदस्य, किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. रमेश कवडो, जयश्रीताई वेळदा जराते,राज बनसोड जिल्हाध्यक्ष आझाद समाज पक्ष, आयटकचे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. वैभव चोपकर,मयूर रायकुंटवार,भंडारा जिल्हा अध्यक्ष कॉ. रवी बावणे, आरमोरी तालुका सचिव संजय वाकळे, महादू कवडो, कन्ना गोटा, सैनू हिचामी, सत्तू हेडो, सुखाराम मडावी, शिलाताई गोटा, लालचंद होळी, गोंडी धर्म प्रचारक शंकर गावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते, या प्रसंगी भारतीय कम्युनिष्ठ पक्ष शंभराव्या वर्षात प्रवेश करीत आहे कॅलेंडर चे उदघाट्न करण्यात आलेत…

यात्रेत सहभागी झालेल्या डावे पक्षांच्या नेत्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी व विकासासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्थानिक समस्या जसे की वीज, पाणी, रस्ते व शिक्षण या विषयांवर चर्चा केली व या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

सुरजागड यात्रा ही आदिवासी संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग असून, यात 70 गावांतील आदिवासींची तसेच गैरआदिवासीची मोठी उपस्थिती होती. यात्रेच्या निमित्ताने डावे पक्षांनी आदिवासी समाजाच्या एकजुटीचा संदेश दिला व त्यांचे जल जंगल जमीन च्या हक्क आणि अधिकार जपण्यासाठी पुढील काळात अधिक ताकदीने लढा देण्याचा संकल्प केला.