मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार*
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे नागपूर येथे राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 3 ते.5 जानेवारी करण्यात आले होते . या मध्ये एकूण चार विभागाने सहभाग घेतला होता. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर हे वीभागामध्ये सहभागी होते. एकून 1917 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये नागपूर विभागा अंतर्गत,भामरागड प्रकल्पातुन भगवंतराव मा.तथा उच्च मा. आश्रम शाळा एटापल्ली येथील 17 वर्षे वयोगटातील उंच उडी मध्ये कु. निलीमा रामसाय मेश्राम हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला, तसेच 19 वर्षे वयोगटात कु. मोनिका सन्नु मडावी हिने उंच उडीत प्रथम क्रमांक प्राप्त केला, व्हॉलीबाल मध्ये कू.अजय सोमा कवडो याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. आन्ही भाला फेक मध्ये कू.रोहीत विनु तलांडे याने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. अतिदुर्गम भागातिल विद्याथ्यांनी राज्यस्तरावर बाजी मारून आदिवासी विभागाचे तथा शाळेचे नाव लौकिक केले.
सदर विद्यार्थाच संस्थेचे सचिव मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र व संस्थेचे अध्यक्षा सौ. भाग्यश्री ताई आत्राम (हलणे कर) यांनी अभिनंदन केले. त्याच प्रमाणे कॉलेज चे प्राचार्य श्री डि.व्ही पोथदुखे सर व सर्व शिक्षक वृंदानी विध्यार्त्यांचे अभिनंदन केले.