मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली: सदर कार्यक्रमामध्ये प्रकल्प -भामरागड मार्फत आदिवासी रेला नृत्य सादरीकरण करण्यात आले. नृत्यांमध्ये आदिवासी जीवन पध्दती,पारंपारिक शेती,रिवाज व त्यांच्या सुख दुःखावर आधारीत स्क्रिप्ट होती.रसिक वर्गाला मंत्रमुग्ध व डोळ्याचे पारणे फेडणारे सादरीकरण पाहून प्रेक्षक,निरीक्षक व अधिकारी वर्गांनी उभे राहून सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सदर नृत्य चा प्रथम क्रमांक मिळाला आहे राज्य स्तरावरील स्पर्धेत निवड झालेली आहे यशस्वीतेसाठी भगवंतराव माध्यमिकआश्रमशाळा तथा कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय पोटदुखे,सहाय्यक शिक्षिका प्रा.सविता पोटदुखे,प्रा.सौ.झिलपे मॅडम व सर्व कर्मचारीवृंदानी सहकार्य केले.माजी कॅबीनेट मंत्री व आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम साहेब व मा.सौ.भाग्यश्री रुतुराज हलगेकर मॅडम व संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.