आरमोरी येथील कोलांडीनाला बंधा­यासाठीच्या लोखंडी प्लेट्स (पल्ले) चोरी प्रकरणातील आरोपी गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात

321

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

दि. 21/12/2024

* मौजा वसा, ता.जि.गडचिरोली कोलांडीनाला बंधा­यामध्ये पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणा­या एकुण 47 लोखंडी प्लेट्स (पल्ले) गेल्या होत्या चोरीस.
* दोन गुन्ह्रांतील चोरीस गेलेला एकुण 2,35,000/- रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 26/11/2024 रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा वसा, ता व जि. गडचिरोली (कोलांडी नाला) येथील बंधा­यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे 17 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून 500 मीटर अंतरावरील 30 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) अंदाजे किंमत 2,35,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट¬ांनी चोरुन नेला होता. त्यावरुन पोस्टे आरमोरी येथे अनुक्रमे अपराध क्रमांक 382/2024 कलम 303 (2) भा.न्या.सं. व अपराध क्रमांक 383/2024 कलम 303 (2) अन्वये गुन्ह्रांची नोंद करण्यात आली होती.

नमुद दोन्ही गुन्हयंाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे पोलीस स्टेशन आरमोरी यांनी सुरु केला असता, नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अशाच प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशन वरुड जि. अमरावती येथे झालेला असून सदर गुन्ह्रामधील आरोपी अटकेत आहेत. अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन वरुड जि. अमरावती यांचेशी संपर्क करून आरोपी नामे कुलदिपसिंग दर्शनसिंग जुणी, वय 27 वर्ष, रा. बिडगांव चेरी कंपनीजवळ, नागपूर ता. व जि. नागपूर याला ताब्यात घेवून कौशल्यपुर्वक तपास केला असता, नमुद आरोपीने मौजा वसा ता. जि. गडचिरोली येथील कोलांडी नाल्या बंधा­यातील दोन्ही ठिकाणांवरील लोखंडी प्लेट्स (पल्ले) चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीकडुन चोरी केलेला मुद्देमाल 1) 2.05 मी लांबी व 0.5 मी. रुंदी असणारे सिल्वर रंगाचे एकुण 30 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) प्रति प्लेट (पल्ला) वजन अंदाजे 100 कि.ग्रॅ. असून प्रति प्लेट (पल्ला) जु.वा.अं.कि. 5000/- रु. एकुण 1,50,000/- रु. ंिकंमतीचा मुद्देमाल. 2) 2.15 मी. लांबी व 0.5 मी. रुंदी असणारे सिल्वर रंगाचे एकुण 17 नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) प्रति प्लेट (पल्ला) वजन अंदाजे 100 कि.ग्रॅ. असून प्रति प्लेट् (पल्ला) जु.वा.अं.कि. 5000/- रु एकुण 85,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल, असा एकुण 2,35,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 30/12/2024 रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असुन, गुन्ह्रांच्या अनुषंगाने पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप, पोलीस स्टेशन आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, पोहवा./2540 विशाल केदार, पोअं /3378 सुरेश तांगडे, पोअं/4371 हंसराज धस सर्व पोलीस स्टेशन आरमोरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.