तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा ताराबाई गावडे यांची मागणी
शैलेश आकुलवार
तालुका प्रतिनिधी एटापल्ली
– दि.२३- एटापल्ली तालुक्यात काल झालेल्या आकस्मिक अवकाळी वादळ वारा अकाली पावसामुळे घराचे टीनचे छत उडून मोठया प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रविवारी तीन चार वाजताच्या दरम्यान घडली. यात अनेक घरांचे छत उडून उडून गेल्याने मोठ्या
प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घराचे पूर्ण छत उडाल्याने सध्यस्थितीत बेघर होण्याची
पाळी आली आहे. त्यांना तात्काळ राहण्याची सोय
आणि आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी
नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी केले आहे रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. आणि अवकाळी वादळ वारा सह पाऊस कोसळला. त्यात शहरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. भांडीकुंडी आणि इतर सामानांची मोठी नुकसान झाली. घरातील सामान पावसामुळे भिजल्यामुळे त्यांच्या पुढे मोठी समस्या निर्माण झाली.
अशाच पदधतीचे नुकसान तालुक्यात झाले असतील करीता ज्या ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे त्याठिकाणी संबंधित विभागाने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी
राहण्याचा निवाराच उघडा पडल्याने त्यांना राहण्याची सोय करावी आणि आर्थिक नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा ताराबाई गावडे यांनी केली आहे