भारतीय कम्युनिष्ठ पार्टीच्या प्रयत्नाने गुडूजूर गावात पूर्व प्राथमिक शाळेचा शुभारंभ

257

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गट्टा केंद्रांतर्गत येणाऱ्या नक्षलग्रस्त गुडूजूर गावात, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करत, २ डिसेंबर रोजी पूर्व प्राथमिक शाळेचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड सचिन मोतकुरवार, अहेरी विधानसभा प्रमुख, भारतीय कम्युनिस्ट पार्टी उपस्थित होते. त्यांच्यासोबत प्रशांत तेलकुंतलवार (ANIS तालुका अध्यक्ष), रमेश कवडो (तालुका अध्यक्ष, किसान सभा), विशाल पूज्जलवार, शंकर आत्राम, दलसू पुंगाटी, नरेश पुंगाटी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्रामसभेच्या निर्णयानुसार शाळेसाठी शिक्षक म्हणून अशोक दानू पुंगाटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेचा शुभारंभ सत्तू दोरपेटी (गर्देवाडा), बारसु उईके (नैताला), सुरेश बाराई, तसेच अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.

शिक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल

गुडूजूर हे आदिवासी बहुल, दुर्गम आणि नक्षलग्रस्त क्षेत्र असून, भारत स्वतंत्र झाल्यापासून या गावात कोणत्याही प्रकारची शाळा नव्हती. सरकारकडून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचे धोरण राबवले जात असताना, या प्रतिकूल परिस्थितीतही शाळा सुरू करण्यासाठी कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती येथे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्यामुळेच आज गावातील मुलांना शिक्षणाचा पहिला अधिकार मिळू शकला आहे.

आगामी योजना आणि मागण्या

सध्या शाळा गोटूलमध्ये सुरू असून पुढील सत्रात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.

शाळेच्या नियमित कार्यासाठी गावात शाळेची इमारत मंजूर करावी अशी ग्रामसभेची मागणी आहे.

उद्घाटन सोहळा आणि आदरांजली

शाळेच्या उद्घाटनप्रसंगी वीर बाबुराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी केंद्र प्रमुख श्री. बेडके सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिलेत तुम्ही पहिले ते चौथा वर्ग गावातच शिकवा असं आव्हान बेडके सरांनी केलं आणि यावेळी जाजावंडीचे मेश्राम सर यांनीही आपली उपस्थिती नोंदवली.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा प्रकाश

गुडूजूरसारख्या दुर्गम भागात शिक्षण सुरू होणे हे केवळ शासकीय पातळीवरील पाठपुराव्याचं नव्हे तर ग्रामस्थ आणि नेत्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं फलित आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी भागात विकास साधण्याचा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

– भारतीय कम्युनिस्ट पार्टी, अहेरी विधानसभा