*एटापल्ली :-* भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे दि. 27 एप्रिल 2023 रोजी नवीन शैक्षणिक धोरणाच्या(NEP) माहितीकरीता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्दारा एक दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.बुटे होते तर कार्यशाळेचे मार्गदर्शक
गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ ए.एस. चंद्रमौली होते. याकार्यशाळेचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प माला मालारपण व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी डॉ एस. एस चंन्द्रमौली, अधिष्ठाता मानव्यशास्त्र, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी अतिदुर्गम व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या एटापल्ली येथे नवीन शैक्षणिक धोरणाची रुपरेषा, आवश्यकता व त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वागिण विकास कसा करता येईल याबाबतची माहिती दिली. याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणामुळे नवीन संशोधनाला वाव मिळेल. यामधूनच विद्यार्थी उद्योजक, व्यावसायिक निर्माण होऊन युवकांच्या रोजगार क्षमतेत वाढ होईल
आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचे कार्यभार वाढून अधिकाधिक युवकांना महाविद्यालयात शिकविण्याची संधी प्राप्त होईल,असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डाँ. संदीप मैंद, प्रा.डाँ.सुधीर भगत, प्रा.डाँ.बि.डी. कोंगरे, प्रा.विनोद पत्तीवार, प्रा.डाँ.व्हि.ए. दरेकार, प्रा.निलेश दुर्गे, प्रा.राजीव डांगे, प्रा.भारत सोनकांबळे, प्रा.चिन्ना पुंगाटी, प्रा.अतुल बारसागडे, प्रा.राहूल ढबाले, प्रा.डाँ. साईनाथ वडस्कर आणि
महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद सुद्धा उपस्थित होते. याकार्यक्रमाचे संचालन प्रा.डाँ.स्वाती तंतरपाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डाॅ. श्रृती गुब्बावार यांनी केले.