मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली: संस्कार पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांतर्गत दोन दिवसीय शेत भेट आणि फळझाड लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राची ओळख करून देणे, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि शेतीसंबंधी कौशल्ये शिकवणे हा होता.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्थानिक शेतावर भेट देऊन विविध पिकांची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी त्यांना भात, गहू, भाजीपाला इत्यादी पिकांच्या लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक व पारंपरिक पद्धतींची माहिती दिली. शाळेच्या शेतात विध्यार्थ्यांना चिकू, आंबा, पेरू, लिंबू इत्यादी लागवडीचे प्रत्यक्ष अनुभव घेतले. यासोबतच विद्यार्थ्यांनी शेतीसाठी लागणारे साधने आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष पाहिला.
फळझाड लागवड प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंबा, पेरू, लिंबू इत्यादी फळझाडांची लागवड कशी करावी, त्यांची योग्य निगा कशी राखावी, याबाबत श्री.एच.के.राऊत मंडळ कृषि अधिकारी, श्री तुषार पवार कृषी अधिकारी, श्री गोसु एस.हिचामी कृषि सहाय्यक, श्री अनिकेत कुमरे कृषि सेवक, श्री निलेश उईके कृषि सेवक यांचेद्वारा सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः झाड लावून त्याच्या संवर्धनाचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्थापक उपक्रमशील शिक्षक श्री विजय संस्कार आणि शिक्षक श्री अंशुल मारगोनवार, श्री नयन चौधरी, सहायक राकेश नरोटे यांचे विशेष योगदान लाभले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक व स्थानिक शेतकरीही उपस्थित होते.
संस्कार पब्लिक स्कूलने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण व कृषी क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.