अतिदुर्गम शाळेत “शाळा पूर्व तयारी मेळावा” संपन्न #jantechaawaaz#news#portal#

108
शैलेश आकुलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
वाळवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक २८/०४/२०२३ शाळा तयारी वा अभियानांतर्गत शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्याचे शालेय आवारात स्वागत करण्यात आले.शाळेतले पहिले पाऊल या उपक्रमाचे यशस्वी अंमलबजावणी झाली तसेच सर्व नवागतांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. पूर्व तयारी मध्ये विविध पोस्टर, फुगे लावून शाळा परिसर सजविण्यात आला होता. प्रसन्न वातावरणात दाखल विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. तद्नंतर नियोजनाप्रमाणे या मुलांचे विकास पत्र भरुन घेण्यात आले. 
विकास पत्रातील शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी या अनुषंगाने विविध साधनांच्या साहाय्याने मुलांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मेळावा संपन्न झाला. 
कार्यक्रमाची रूपरेषा शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव लेकामी, शिक्षण प्रेमी बिरजू आतलामी , अंगणवाडी सेविका लिला लकडा, मदतनीस झिलो लकडा व दाखल पात्र विद्यार्थी यांचे पालक सहभागी झाले होते.