भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एटापल्ली तालुका सहसचिव कॉ. शरीफ शेख यांना श्रद्धांजली

185

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एटापल्ली *तालुका सहसचिव कॉ.शरीफ शेख* यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्याच राहत्या घरी *दु:खद निधन* झाले. त्यांच्या जाण्याने पक्षासाठी आणि समाजासाठी एक मोठी हानी झाली आहे. कॉ. शरीफ शेख हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला.

या दु:खद प्रसंगी *ऑल इंडिया किसान सभेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कॉ. डॉ. महेश कोपुलवार*, *जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, जिल्हा सहसचिव कॉ. ऍड. जगदीश मेश्राम, अहेरी विधानसभा प्रमुख कॉ. सचिन मोतकुरवार, एटापल्ली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लूरवार, कॉ. प्रकाश खोब्रागडे, कॉ. विशाल पूज्जलवार, कॉ. शुभम वनमवार, कॉ. आकाश तेलकुंतलवार* यांसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतक अहेरी येथे त्यांच्या भावाच्या घरी भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.

कॉ. शरीफ शेख यांचा समर्पणभाव, प्रामाणिकपणा आणि पक्षासाठीची कामगिरी कायम प्रेरणादायी राहील. *त्यांचं अंतिम पार्थिव दर्शन उद्या सकाळी ११ वाजता अहेरी येथील त्यांच्या भावाच्या घरी, छोट्या मस्जिदजवळ ठेवण्यात येणार आहे*

*भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी वेळेवर उपस्थित राहून आपले श्रद्धांजली अर्पण करावी*

कॉ. शरीफ शेख यांच्या आठवणी सदैव आमच्यासोबत राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी आहे.

*भारतीय कम्युनिस्ट पक्ष*
*अहेरी विधानसभा क्षेत्र*