आदिवासी परधान समाज मंडळा तर्फे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी.

81

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली :- दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आदिवासी परधान समाज मंदीर गडचिरोली येथे आदिवासिंच्या जल, जंगल, जमीन यासाठी इंग्रजांविरुद्ध प्रखर संघर्ष करणाऱ्या भगवान बीरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून
प्रियदर्शन मडावी, जिल्हाअध्यक्ष आदिवासी टाइगर सेना, अध्यक्षस्थानी आदीवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी , प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. किर्तिकुमार उईके ,महेश गेडाम,मुल, ज्येष्ठ नागरिक मानसिंग सुरपाम, सुरज शेडमाके , गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह, विनोद सुरपाम, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुळमेथे, महेंद्र मसराम हे होते.
सर्वप्रथम आदिवासी जननायक क्रांतीसुर्य, धरतीआबा, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी समाज मंडळाचे युवा सदस्य अजय सुरपाम, आदिवासी एकता युवा समितीचे उपाध्यक्ष सुधीर मसराम,युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश सलामे, विजय सुरपाम,आकाश कुळमेथे, नंदकिशोर कुंभारे,मुकुंदराव उंदीरवाडे, विवेक वाकडे,गणेश मेश्राम,अनिकेत बांबोळे, राज डोंगरे, राकेश कुळमेथे,नितीन शेडमाके, विक्की मसराम,योगेश कोडापे,अंकित कुळमेथे, सुरज गेडाम, साहिल शेडमाके,रोहित आत्राम, वैभव रामटेके, साहिल गोवर्धन,ताजिसा कोडापे, महिला सदस्य शालू सुरपाम, शोभा शेडमाके, गंगा सलामे, सुनिता मसराम, प्रफुला जुनघरे,वनिता कोडापे, निरुता कोडापे, सोनाली सुरपाम, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुधीर मसराम यांनी केले तर आभार रुपेश सलामे यांनी मानले.