प्रतिनिधी//
-श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांचे प्रतिपादन
आरमोरी – जंगल कामगार सहकारी संस्था, समाजातील उपेक्षित घटक असलेल्या सभासदांसाठी वरदान ठरले आहे. त्यामुळे संस्थेच्या बळकटीकरणासाठी सभासदांचे योगदान महत्त्वाचे आहे. जंगल कामगार सहकारी संस्थेला मिळणारी दहा टक्के कल्याणकारी निधी व विविध योजना संस्थेच्या सभासदांसाठी राबविल्या जातात, त्यामुळे जंगल कामगार चळवळ सभासदांच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यानी केले
आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती व १ मे कामगार दिनानिमित्त संस्थेच्या सभासदांना संसार उपयोगी १० टक्के कल्याणकारी निधीतून सभासदांना पाण्याच्या कॅन वाटप करण्यात आले त्यावेळी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम अध्यक्षीय स्थानावरुण बोलत होते
.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे संचालक सुरेश मेश्राम यादोराव कहालकर धर्मराज मरापा धमा दिघोरे गोपाल खरकाटे उजला मडावी गोपिकाबाई कोल्हे वकटु पुराम युवराज सपाटे नंदकिशोर मरस्कोले जयद्र पेन्दाम जिवन पुराम गोविंदा मडावी पांडुरंग मेश्राम राजेंद्र सयाम दिनेश बाबुराव कोंडापे अशोक ठाकरे आठोळे यादव सयाम पढरी कोडाम यासह शेकडो सभासद उपस्थित होते
पुढे बोलताना श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी सांगितले की गेल्या वर्षापासून सभासद व पाल्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी आरोग्य शिबीर शस्त्रक्रिया करण्यास मदत रक्तदान शिबीर घेऊन सभासदांचा सर्वांगिण विकास कसा साधता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे.