अहेरी पंचायत समिती समोर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांचे आमरण उपोषण!
बनावट बिले, भ्रष्टाचार व दस्ताऐवज खोड़तोड़चा ठपका
अहेरी*:- पंचायत समिती अंतर्गातील व्येंकटरावपेठा ग्राम पंचायतीचे ग्राम सेविका सुषमा मड़ावी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तीव्र मागणी करून येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी मंगळवार 2 मे पासून पंचायत समितीच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
उपोषणात प्रशांत नामनवार यांनी , ग्रामसेविका सुषमा मड़ावी यांनी भ्रष्टाचार करून बनावट बिल जोडल्याने व शासकीय दस्ता ऐवजात खोड़तोड़ केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करुण निलंबित करावे. तसेच ग्राम सेवकांचे रिक्त पदे तात्काळ भरावे, अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत मध्ये माहिती अधिकारी कायदा 2005 च्या कलम 4 ची माहिती ताबड़तोब प्रकटन करणे व विहित मुदतीत माहिती न देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ
शिस्तभंगाची कार्यवाही करणे आदी मुद्द्याना घेऊन प्रशांत नामनवार यांनी आमरण उपोषणाला बसले असून ग्रामसेविका सुषमा मड़ावी यांच्यावर ताबड़तोब कड़क कार्यवाहीची एकमुखी मागणी केले आहे.
उपोषणाला अनेकांचे पाठिंबा
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांच्या आमरण उपोषणाला महागाव ग्राम पंचायतीचे उपसरपंच संजय अलोणे, भाजपाचे अहेरी तालुकाध्यक्ष रवि नेलकुद्री, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संतोष ताटीकोंड़ावार, शंकर ढोलगे,
विनोद जिल्लेवार, विनोद अक्कनपल्लीवार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, डॉ. तिरुपती कोलावार, विकास उईके नगरसेवक, मयूर पिपरे, आदी व इतरांनी पाठिंबा दर्शविले असून ग्रामसेविका सुषमा मड़ावी यांच्यावर कठोर कार्यवाहीची एकमुखी व तीव्र मागणी केले आहे.







