मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथे
पंचशील बौध्द समाज मंडळ व माता रमाई महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत बुद्ध व बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण १४ ऑक्टोबर रोजी झाले.यावेळी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार हे उद्घाटक होते.तर काँग्रेस आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हनमंतु मडावी अध्यक्षस्थानी होते.त्यावेळी बुध्द – भीम गीतांचा कव्वली कार्यक्रम पार पडला.तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचारण करुन मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
पंचशील बौध्द समाज मंडळ व माता रमाई महीला मंडळ छल्लेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत बुद्ध व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्ती प्रतिष्ठापणा सोहळा संपन्न तसेच बुद्ध भीम गीतांचा जंगी सामना कव्वाली या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. अजय भाऊ कंकडालवार.अध्यक्ष.मनून हणमंतू मडावी.
यावेळी रोजाताई करपेत नगरपंचायत नगर अध्यक्ष अहेरी,सुनीता कुष्णाके माजी जी.प. सदस्य,सुरेखा आलम माजी सभापती अहेरी,अजय नैताम माजी जि.प.सदस्य, प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,चंदु बेझलवार सामाजिक कार्यकर्ते, नरेन्द्र गर्गम,हरिष हाऊ गावडे उपसरपंच देवलमरी,राजू दुर्गे ग्रा.प सदस्य महागाव,सचिन भाऊ ओलेट्टीवार उपसरपंच कमलापुर, स्वप्निल मडावी,रिंकू आत्राम,चिंटू भाऊ आत्राम, जावेद भाऊ, प्रमोद भाऊ गोडसेलवार,सचिन पांचार्या,विनोद रामटेकेसह आदी उपस्थित होते.