धनगर समाजाला आदिवासीं समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये*:-आमदार डॉक्टर देवराव होळी ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी होणाऱ्या आदिवासींच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा, मोर्चात सहभागी होणार

49

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

महामहीम राज्यपाल , मा. मुख्यमंत्री, मा .उपमुख्यमंत्री व मा. आदिवासी विकास मंत्र्यांना या संदर्भात निवेदन

गडचिरोली:-धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावे यासाठी धनगर समाज आग्रही आहे . त्याकरिता निवडणुकीच्या तोंडावर सुरू असणाऱ्या घडामोडी या भ्रम निर्माण करणाऱ्या असून राज्यातील महायुतीचे सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देणार नाही असा आपला विश्वास आहे . तरीही असा प्रयत्न झाल्यास त्या निर्णयाला आपला विरोध आहे. अशा निर्णयामुळे आदिवासी समाजामध्ये शासनाविषयी नाराजीची भावना निर्माण होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यात येऊ नये. अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

त्यांनी याबाबतचा पत्रव्यवहार राज्याचे महामहीम राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे मेलच्या माध्यमातून केला असून लवकरच भेट घेऊन या संदर्भात विनंती करणार असल्याचे म्हटले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने या संदर्भात ६ ऑक्टोबरला होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाला आपला पूर्ण पाठिंबा असून आपण स्वतः पूर्णवेळ या मोर्चामध्ये सहभागी राहणार असल्याचे आमदार डॉक्टर देवराव होळी म्हणाले.