माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी जिमलगट्टा, देचली वासियांना दिला सुटकेचा श्वास.तात्काळ केली बस ची व्यवस्था.

85

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

जिमलगट्टा, देचली मार्गे जाणारी राज्य महामंडळाची बस सिरोंचा फाटा आलापल्ली नाल्याजवळ दीड तासापासून बिघडलेल्या अवस्थेत होती. ही बाब ताईंना कळताच ताईंनी अहेरी आगाराशी संपर्क साधून तात्काळ बस ची सुविधा करून स्वतःघटनास्थळी जाऊन प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच लहान लेकरांना बिस्केटचा वाटप करत प्रवाश्यांना सुटकेचा श्वास दिला. यावेळी तालुकाध्यक्ष सिनूभाऊ विरगोनवार,नगरसेवक अमोलभाऊ मुक्कावार,आलापल्ली ग्रा. प. सदस्य स्वप्नीलदादा श्रीरामवार,युवानेते अनुराग बेझलवार, युवानेते सुमितभाऊ मोतकूरवार,संदीप येमनूरवार, संतोष यमुलवार व मोठ्या संख्येने प्रवाशी उपस्थित होते.