एटापल्ली शस्किय विश्राम गृह येथे संदीप कोरेत यांची पत्रकार परिषद

126

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

शासनाच्या योजना फक्त कागदावर
गोर गरीब जनतेवर अन्याय होत आल्याचे. संदीप कोरेत यांनी म्हंटले
संदीप कोरेत यांचा बुत कार्यकर्ता मेळावा दुपारी १वाजता घेण्यात आला. ह्या मेळाव्यात गुरूपल्ली-उडेरा गणातील बुत (जिल्हा परिषद) कार्यकर्ते उपस्थित होते. सोबत एटापल्ली नगर पंचायत प्रभागाचे कार्यकर्तेपण सहभागी झाले होते.
एकंदरीत एटापल्ली नगर पंचायत बुत ८व उडेरा-गुरूपल्ली गण १५ह्याप्रमाणे एकुण २३बुत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
सदर मेळाव्यात भावी होणारे आमदार यांनी आपल्या वक्तव्यात कथन केले की, आजही एवढा मोठा स्वातंत्र्याचा कालावधी लोटला स्वातंत्र्याचा अम्रुतमहोत्सव पार पडला तरीही आदिवासी हा पाहीजे त्या गतीने विकास होण्यात अपयशी ठरले आहे. ६० वर्षापासून आत्राम घराण्याची एकहाती विधानसभेत सत्ता आहे व ह्यामुळे हे घराने हुकूमशाही ने वागत असुन इतर कुणालाही जुमानता नाहीत व मनमानी कारभार सुरू असुन नियमबाह्य कामे होत असुन बांधकाम विभागात ते म्हणतील त्यांनाच कामे मिळत असुन जे हक्कदार कंत्राटी आहेत सुशिक्षित बेरोजगार कंत्राटी आहेत त्यांना वावच नाही व अधिकारी सुध्दा भीतीपोटी ते म्हणतात तसेच कार्य व प्रक्रिया पार पाहतात शिवाय अहेरी विधानसभा क्षेत्रात विपुल वनसंपत्ती असुन जल, जंगल जमिन व हे आदिवासींच्या जिवनमानाचे स्त्रोत पुर्णता विकुन टाकण्याचा घाट मांडले आहेत. ह्यामुळे जो आदिवासी ह्या संपत्ती च्या जोरावर ताकदीनिशी जिवन जगत होता, तो आता सर्व संपन्न नसुन त्यांची अस्मिता नोट होऊन दुर्बल झाला आहे व ह्याला जबाबदार आत्राम घराण्याची एकहाती विधानसभेत सत्ता आहे.
ह्या विधानसभेत असलेल्या आमदारांनी व मंत्र्यांनी कदीही आदिवासी जनतेचा कल्याण होणारे असे कोणत्याही प्रकारचे लोकहितकारी कामे न करता
फक्त सत्ता उपभोगण्याचे काम केल्यामुळे विकासापासुन येथील आदिवासी जनता कितीतरी लांब गेली आहे.
आज रोजगारी संबंधित गाजावाजा केला जात आहे पण शिक्षित असून कौशल्य असुन फक्त मजुर किंवा सुरक्षा रक्षक म्हणून ओळखले जात आहे परंतु कित्येक स्थानिक अभियंता आहेत पण कंपनी त्यांना संधि देत नाही तरी पण सत्ताधारी दुर्लक्ष करून परप्रांतीय याचीच बाजु धरून स्वत:चे हीत जोपासला जात आहे तेंव्हा वेळीच सावध व्हा व येत्या विधानसभेत सत्ता उलटवुन लावा व आपला योग्य असा मानुस म्हणजे संदीप कोरेतलाच निवडणुकीत निवडा असे आवाहन संदीप कोरेत यांनी मेळाव्यात गुरूपल्ली-उडेरा व एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रातील बुत कार्यकर्ता यांना आव्हान केला आहे.