मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*मूलचेरा:-* तालुक्यातील येल्ला येथील रहिवासी श्री.लालू भाना टेकुलवार हे अनेक महिन्यापासून अपेंडीस या आजाराने ग्रस्त होते.डॉक्टरांनी शस्त्रक्रिया(Opration) करावी लागणार असे सांगितले, पण कुटूंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने गडचिरोलीच्या खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया(Opration) करणे शक्य नव्हते.त्यामुळे टेकुलवार कुटूंब चिंतेत होत.पण ही टेकुलवार कुटूंबाची बाबा स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपले स्थानिक कार्यकर्ते पाठवून टेकुलवार कुटूंबाला आधार देत *10000/-(दहा हजार रुपये)* आर्थिक मदत केली.आपण तुमच्या प्रत्येक अडचणीत साथ देणार असे आश्वासन दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,राजूरकर सर,कुळमेथे सर,फुलजले सर,वैष्णव ठाकूर,मल्ला पानेवर,गंगाराम टेकुलवार,रामदास टेकुलवार,लचमा टेकुलवार,सोमा टेकुलवार आणि कुटुंबातील इतर सदस्यगण उपस्थित होते.!