महागाव बूज येथे व्यायाम शाळेचे उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून व्यायाम साहित्य खरेदीसाठी ७०,००० (सत्तर हजार ) रुपयांची केली अर्थिक मदत

146

गावातील युवकांनी मानले राजेंचे आभार!

*अहेरी:-* जिथे व्यायामाची आवड तेथील युवा सुदृढ युवा पिढीला व्यायामाची आवड लागावी आणि परिसरातच तशी सोय व्हावी म्हणून मौजा महागाव बूज येथे क्रीडा विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या व्यायामशाळेचे लोकार्पण गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.अगोदर फक्त व्यायाम शाळा इमारत बांधकाम झालेले होते त्या इमारतीमध्ये व्यायाम साहीत्य नव्हते. ही माहिती जेव्हा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना गावातील युवकांनी दिली. तेव्हा राजे साहेब व ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय अलोने यांच्या थोड्या प्रयत्नाने आता व्यायाम शाळेचे साहीत्य समाज कल्याण विभागाकडून उपलब्ध झालेले आहे. व जे साहीत्य उपलब्ध होऊ शकले नाही ते साहीत्य खरेदी करण्याकरीता राजे अम्र्बीशराव आत्राम यांनी ७०,००० हजार रूपयांची आर्थिक मदत केली. आज त्या व्यायाम शाळेचे ग्राम पंचायत सरपंच कु. पुष्पा मडावी, सदस्य-लालू वेलादी, सदस्य-दिपाली कांबळे, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती-श्री- सुरेश वेलादी, सदाशि गर्गम,रविंद्र गंगाधरीवार,लिंगा पानेम, पुरूषोत्तम गर्गम व ग्राम पंचायत उपसरपंच-संजय अलोने व ग्रामसेवक- अनिल बंडावार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार झाले.

उर्वरीत साहीत्य खरेदी करण्यासाठी राजे साहेबांनी जी मदत केलेत त्यासाठी गावातील युवक वर्ग त्यांचे खुप खुप आभार मानले!