कत्तलीसाठी नेत असलेल्या तस्करांच्या तावडीतून गोवंशची सुटका करण्यात हालेवारा पोलिसांना यश आरोपी चालक – वाहक दोघेही फरार

182

दिनांक १५। ९। २४रोजी MH34BZ 0067ह्या वाहनाने गायी-बैलाची तस्करी करीत असल्याची गुप्त खबर पोलीस स्टेशन हालेवाराला मिळाली व ह्याच खबरीच्या आधारावर पोलीसांनी सापडा रचला व गाड़ी थांबवून तपास करण्यात येणार असल्याचे चिन्ह दिसतात सदर गाडीचा चालक व वाहक दोघेही फरार झालेत.
गाडीची तपासणी केली असता गाडीत दाटीदाटीने २९जनावरे कोंबुन नेत असल्याचे पोलीसांना निदर्शनास आले असता वाहन ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन हालेवाराला जप्त करण्यात आले आहे. व जनावरे पोलीस स्टेशन हद्दीत मोकळे सोडण्यात आले असून त्याची तात्पुरती देखभाल पोलीस करीत असून फरार चालक व मालकाचा शोध सुरू आहे.