प्रतिनिधी :तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली: छत्तीसगड सीमेवर असलेला वांगेतूरी आरोग्य उपकेंद्र हा एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला उपकेंद्र आहे यावर्षी या उपकेंद्राला पिपंली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आलाय परंतु वांगेतूरी उपकेंद्रातील नागरिकांना पिपंली बुर्गी जाण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता जाण्यास रस्ते नाही त्यामुळे त्यांना छत्तीसगड पार करून पिपंली बुर्गी जावा लागत होता तर त्या भागातील नागरिकांनी हे गोष्ट भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचा कॉ सचिन मोतकुरवार यांना सांगितले मग त्यानंतर मग कम्युनिष्ठ पक्ष व सुरजागड इलाक्याचे प्रमुख मा सैनुजी गोटा यांनी मिळून जिल्हा परिषद च्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली व समस्याबद्दल जाणीव करून दिली परत गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात यावे असे मागणी त्यांचा पुढे ठेवण्यात आली व येणाऱ्या काळात हे उपकेंद्र परत गट्टाला जोडून देऊ असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले याप्रसंगी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे कॉ सचिन मोतकुरवार, मा सैनुजी गोटा माजी जि प सदस्य, कॉ रमेश कवडो किसान सभा तालुका अध्यक्ष,मा शिलाताई गोटा माजी प स सदस्या, कॉ, शरीफ शेख कॉ, तेजेश गुज्जलवार पतू पोटावी दोडुरं,माजी सरपंच पुरसलगोंदी,कॉ निर्मला गोटा,बेडके मॅडम,दुलसा पुंगाटी गाव पाटील गुडूजूर,चेतन पुंगाटी,दोहे हेडो अडेंगे पाटील, सुंदरसाई किसपोटा रेकलमेट्टा, कॉ शिवाजी नरोटी व अनेक कम्युनिष्ठ पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होतेत….