महायुती तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस साजरा अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट वितरीत मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकार!

35

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*अहेरी:*- येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अहेरी तालुका महायुती तर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस रुग्णांना फळे व बिस्कीट वितरीत करून साजरा करण्यात आले.
महायुतीचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकार व सूचनेनुसार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आले.
सर्व प्रथम अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.के. धूर्वा व गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्या तनुश्री ताई आत्राम यांच्या शुभहस्ते रुग्णांना फळे व बिस्कीट वितरीत करण्यात आले.
त्यानंतर भाजपाचे तथा आलापल्ली ग्राम पंचायतीचे उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, रमेश समुद्रालवार, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, सुरेंद्र अलोणे, नगरसेवक विलास सिडाम, नगर सेवक विलास गलबले , महेश बाक्केवार, राजेश्वर रंगूलवार ,मखमुर शेख, संदीप ढोलगे, राहुल गर्गम, योगेश दंडीकवार, आदित्य पुसालवार, आफ्रिदी सैय्यद, सुवर्णा पुसलवार, श्रीशा कुडकावार, जरीना शेख, शाहरुख शेख आदी व बहुसंख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.