हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावलेल्या सभासदांच्या व्यक्तींना अंत्यविधी साठी श्री गुरुदेव जंगल कामगार संस्थेच्या वतीने मदत. #jantechaawaaz#news#portal#

44
प्रतिनिधी//
जोगीसाखरा- येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा ही आज पर्यंत सेवाभावाची जान ठेऊन संस्थेचे पळसगाव येथील माजी संचालक हणुजी गेडाम यांची पत्नी सरस्वती गेडाम वय ७० यांचे काल अचानक हृदय विकाराचे झटक्याने निधन झाल्यामुळे त्यांच्या परीवारावर डोंगरच कोसळले असल्यामुळे सामाजिक
 दायित्वाच्या दृष्टीने त्याच्या दुःखात संस्था सहभागी होऊन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या मागदर्शनात श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे संचालक दामोधर मानकर  यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने अत्यविधी साठी  मुलगा विनोद गेडाम यांच्या कडे मदत देण्यात आली.
यावेळी चौकीदार दिवाकर राऊत किर्तीलाल पुराम शैलेश कुमरे संदिप कांबळे  राजेंद्र ढोरे संपन चौके उपस्थित होते.  
श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था सभासदांच्या विविध समस्याचे निवारण वेळेवर रक्तताची मदत, शस्त्रक्रियेसाठी मदत,मुलांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबीर  आरोग्य शिबीर  सभासदांच्या अंत्यविधी साठी मदत या कार्याने जनमानसात कौतुक केले जात आहे.हे विशेष.