प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हालेवारा येथील उपसरपंच श्रीमती संध्याताई कन्नलवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुण आरोग्य अधिकारी विजय भोये हे प्रामुख्याने उपस्थित होत. तसेच आरोग्य कर्मचारी सडमेकताई आरोग्य सेवीका, तसेच जोत्सनाताई गेडाम (आशाताई) तसेच गावातील सुप्रतीष्ठीत नागरीक दिवाकर इप्पावार, संतोष निकाडे, गणपत दासरवार, रेशमाताई मटामी, विटाबाई मडावी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक्ता जिल्हा परिषद शाळेचे मुख्यधापक श्री बाबुराव गोटा सर यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषनामध्ये ५ सप्टेंबर शिक्षक दिना विषयी शिक्षक दिन का साजरा केल्या जातो व शिक्षकाचे समाजामध्ये स्थान काय असते त्या बददलचे महत्व पटवुण सांगीतले. आणि प्रमुख पाहूणे म्हणुण आरोग्य अधिकारी यांचे सुध्दा भाषन झाले. त्यांनी सुध्दा शिक्षक दिना विषयी सुमधुर व्याख्यान व मार्गदर्शन केले. त्या सोबतच शाळेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली होती. व त्यासोबतच मुलांचा कौशल्य विकास झाला पाहीजे याचा एक भाग म्हणूण विदयार्थाना शिक्षक बनुन शिकविण्याची संधी देण्यात आली. विदयार्थानी देखील शिक्षक दिना निमीत्य शकवीण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या सम्पन्नते करिता येथील शाळेचे मुख्यधापक बाबूराव गोटा सर यांनी खुप परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी रित्या संम्पन केले.







