मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
एटापल्ली:तुमरगूंडा केंद्र बुर्गी पंचायत समिती एटापल्ली येथे वर्ग १ते८भरतात व शिक्षक संख्या ६असुन विध्यार्थी संख्या ८९आहे.
सन२३-२४मध्ये ह्या शाळेची जुनी इमारत थोडी जिर्ण झाली होती व किरकोळ दुरुस्ती करण्याची गरज होती तेंव्हा ह्या इमारती करीता १५व्या वित्त आयोग मधुन तगड्या अंदाज पत्रकाने दुरूस्ती दाखविण्यात आली व काम पूर्ण दाखवून पुर्ण निधीसुध्दा विल्हेवाट लावण्यात आला, पण इमारतीची अवस्था बघीतली की, असे वाटत आहे की आजच दुरूस्तीला सुरवात झाली की, काय ❓
ह्या वर्गखोलीचा दुरूस्ती नंतर सिमेंट टीना बसवल्या त्या संपुर्ण गळण्यायोग्य बसवल्या आहेत, आतुन परिपुर्ण प्लास्टर केलेला नाही व छतावर टीनटपर बसवलेले नाही. रंगरंगोटी नाही व एकंदरीत नियोजन शुन्य दुरूस्ती झाली आहे व हे दुरूस्तीचे काम स्वत ग्रामसेवकांनी करवून घेतले आहे.
ह्या अशा बिगारी कामाचा मोजमाप पुस्तकानुसार जिल्हा परिषद गडचिरोलीने चौकशी करण्याची मागणी शाळा प्रशासनाने व शाळा व्यवस्थापन समितीने सदर प्रतिनिधीशी व्यथा व व्यवस्था दाखविली असुन सदर बिल बनवनारा अभियंता यांचेवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.