गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गुळुंजूर गावात जि.प. प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी-भाकपा प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

115

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

एटापल्ली, दिनांक 13** – गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गुळुंजूर गावातील रहिवाशांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी भाकपाच्या कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी एटापल्ली यांच्याकडे जि.प. प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.

भाकपाचे कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जककुलवार, कॉ. विशाल पूजजलवार आणि कॉ. शिवाजी नरोटे यांनी याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आपली मागणी मांडली. त्यांनी सांगितले की, गुळुंजूर गावात शालेय सुविधा नसल्यामुळे येथील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या गावात जि.प. प्राथमिक शाळा सुरू करणे अत्यावश्यक आहे.स्थानिक रहिवाशांनी या मागणीला पाठिंबा दिला असून, त्यांनीही शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “गुळुंजूर गावातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आपली मागणी मांडली आहे. आम्हाला विश्वास आहे की, प्रशासन आमच्या या मागणीकडे सकारात्मकपणे विचार करेल.”