प्रतिनिधी//
नगर पंचायत अहेरी आणि ग्रा.पा.पू अहेरी कार्यालयावर घाघर मोर्चा काढून निषेध करू
अहेरी तहसीलदार साहेब तथा नगर पंचायत कार्यालय मध्ये निवेदन दाखल अहेरी नगर पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र 17 गडअहेरी , गडबामनी येथे पिण्याचा पाण्याची भीषण पाणी टंचाई आहे तेथील जनतेला एक एक किलोमीटर दुरून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. यापूर्वी सुद्धा नगर पंचायत ला वारंवार निवेदन तोंडी तक्रार देवून सुद्धा सादर पाण्याचा समस्येची कायम स्वरुपी उपाययोजना केली नाही त्यामुळे या भर उन्हाळ्यात गडआहेरी येथील जनतेला नाहक त्रास सहन करावं लागत आहे. नगर पंचायत नी थातुर माथूर दुहेरी नळ योजनेचा काम करूनही ते फक्त 15 मिनिट सुरू आणि दोन तास बंद ही अवस्था काही दिवसापूर्वी काम केलेल्या
ड्युअल पंप ची आहे त्यामुळे तेथील जनतेला सदर पाण्याचा उपयोग होत नाही आहे. लगेच टँकर ने पाणी पुरवठा न केल्यास नगर पंचायत आणि ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय अहेरी येथे घाघर मोर्चा काढण्यात येणार सदर निवेदन अमोल मुक्कावार नगर सेवक न प अहेरी यांचे नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते राहुल दुर्गे, पुष्पा ताई मसराम, लता दुर्गे, सुनीता राऊत, सविता ओंदरे, बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होते.







