तुकुम वार्ड आणि शांतीनगरातील समस्या मार्गी लावा #jantechaawaaz#news#portal#

62
प्रतिनिधी//
देसाईगंज आदिवासी काँग्रेस कमिटी तर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

देसाईगंज
    नगर परिषद क्षेत्रातील तुकुम वार्ड, शांतीनगर विविध समस्यांनी ग्रासले असून तेथील समस्या  घेऊन आदिवासी काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षा जयमाला पेंदाम यांनी  नगरपरीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तात्काळ मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले आहे.

     निवेदन त्यांनी म्हटले आहे की, तूकुम वार्ड येथील मुख्य चौकात हायमास्ट मागील दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. तर मेन रोड वरील असलेल्या पोलवरील लाईट पूर्णतः बंद असून अजूनपर्यंत लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गाने ये जा करण्यास नागरिकांना भिती वाटत असून, पूर्णतः या मार्गावर सायंकाळी घराकडे जाताना अंधार सावटलेला वाटत असल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी लवकरात लवकर पोलवर लाईट लावण्यात यावे.  तसेच याच मार्गावर गट्टू लावण्याकरिता आणलेली रेती मागील सहा महिन्यांपासून 

जैसे थे स्थितीत पडून असून नागरिकांना ये जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. तर शांतीनगर येथील गावळे यांच्या घरापासून ते पुढे जाणाऱ्या नाल्याला नालीचे बांधकाम करून जोडण्यात यावे जेणेकरून रस्त्यावर सांडपाणी साचणार नाही. तेथील समाज मंदिराचे दुरुस्तीचे काम अजूनपर्यंत करण्यात आले नाही, आदी समस्या मार्गी लावण्याबाबत आदिवासी काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष जयमाला पेंदाम यांनी देसाईगंज येथील नगर परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

      यावेळी निवेदन देताना, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम, तालुका काँग्रेस कमिटी चे महासचिव विलास बनसोड, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, युवक काँग्रेस कार्यकर्ता अरविंद दुपारे, तांबेश्वर ढोरे, राजेंद्र तूपटे, उमेश उईके, छाया बावणे, नम्रता उईके, योगिता कन्नाके, अल्का जुमनाके, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.