प्रतिनिधी//तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली: सध्या पावसाचे
दिवस सुरू आहे मात्र एटापल्ली शहरातील नागरिकांना नरक यातना भोगावे लागत आहे.शहरातील विर भाऊराव चौक ते एटापल्ली नाल्यांपर्यत जाणारा रस्ता गेल्या काही वर्षांपासून खड्डे मय झाले आहे.मात्र या रस्त्यावर साधी डागडुगी शुध्दा करण्यात आली होती.परतु पाउस पडल्याने अजून जास्त खड्डे पडले.त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना चिखलातून ये जा करावी लागत आहे.या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.विषेश म्हणजे या मार्गावरून बांधकाम विभागाचे अधिकारी ये जा करतात.मात्र रस्त्याच्या दुसरी त्यांचे लक्ष नाही का.त्यांची काही अडचण आहे का.असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन केले जाईल असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करित आहे . एटापल्ली शहरातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असताना याकडे संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार केल्या नंतर ही.पदाधिकारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येते.एटापल्ली तालुका मुख्यालयातून दिवस भर वाहनांची वर्दळ असते वीर भाऊराव शेडमाके चौक ते एटापल्ली नाल्या पर्यंत जवळपास दोन किमी अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरुन रुग्णांना सुद्धा. चालने खुप कठीण झाले आहे.
शिवाजी चौक ते नगरपंचायत पर्यंत हा रस्ता शुध्दा खड्डे मय झाला.आहे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्ष कारभाराचे हे उदाहरण दिसत आहे या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे वेळी लक्ष देण्याची गरज आहे.या रस्त्याकडे त्वरित दुरुस्त करावी.अशी मागणी एटापल्ली येथील नागरिकांनी केली आहे.