प्रतिनिधी,//
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*अहेरी:-* राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन आलापल्ली व परिसरातील मद्दीगुडम, रामय्यापेठा, नागेपल्ली येथील युवक व युथ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षात प्रवेश केले.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युवक व युथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजून नवी उभारी येत असल्याचे संकेत दिसत आहे.
युवकांनी शुक्रवार 19 जुलै रोजी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश घेतले. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात घालून स्वागत केले. आणि पुढील सामाजिक, राजकीय कार्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
नुकतेच मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी नजीकच्या वडलापेठ येथे स्टील फॅक्टरी साठी कंपनीला जागा उपलब्ध करून दिल्याने आणि एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे माईनिंगसाठी व कोनसरी येथे कारखाना उभारणीसाठी पुढाकार घेतल्याने युथ व युवकांनी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे निश्चय केले असून त्यामुळेच युवकांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहे.
पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार यांच्या नेतृत्वात राजू बंदुकवार, श्रीनिवास गचार्लावार, हितेश्वर मडावी, सौरभ वसाके, स्वप्नील गुरूनुले, स्वामी तुमडे, साईनाथ बिटपल्लीवार, राजेश राजनालवार, शार्दुल निंगलवार, प्रेम बोरुले, सुप्रिष बिटपल्लीवार, शुभम मर्दालावार, सोमेश्वर तलांडे, गुलशन दुर्गे, ओमप्रकाश मोहूर्ले, लक्ष्मण राऊत, दिनेश कुमार रामटेके, जितेंद्र कोटरंगे, निलेश चाकूरकर, ठाकूर गेडाम, राजेश मडावी, प्रीतम पडगीलवार आदी व असंख्य युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षात प्रवेश करून एकनिष्ठतेने कार्य करण्याचे निर्धार केले.