तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे निवेदनातून मागणी.
आरमोरी – शासनाने तालुक्यांची भोगोलीक परिस्थिती पाहता रुग्णांना त्रास होऊ नये चांगली सोय उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने आरमोरी येथे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करुण रुग्णांना सेवा देणे सुरू आहे परंतु हे उपजिल्हा रुग्णालय तिन जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने चंद्रपूर
जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील तसेच भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील रुग्ण तसेच आरमोरी देसाईगंज तसेच अन्य तालुक्यातील रुग्ण आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याने यात एकट्या आरमोरी तालुक्याची लोकसंख्या लाखांच्या वरुण आहे तसे असताना या ठिकाणी फक्त पन्नास खाटाचा उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त रुग्णांची वळदळ असल्याकारणाने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करावे लागतो तसेच दंत चिकित्सक सह अन्य पदे रिक्त असल्याच्या समस्या रुग्ण व रुग्णाच्या
नातेवाईकांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम याच्या शिष्टमंडळाने भेट दिली असता सांगितले यांची दखल घेऊन शासनाने उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटाचा दवाखाना मंजुर करण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
यावेळी अनिल किरमे दिवाकर पोटफोडे मनोज बोरकर निलकंठ सेलोकर प्रदिप सडमाके आदिकराव मेत्राम रुपेश झजालकर मयुर मेत्राम आदि उपस्थित होते.