माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांचा भाजपा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपचे जेष्ठ नेते, राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार,राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम, खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला
२४ जून रोजी सुधीरभाऊ मुनगंटीवार गडचिरोली जिल्ह्याचे दौऱ्यावर होते. यावेळी अहेरी येथील हकीम लॉन लाभार्थी संमेलन घेण्यात आले. या संमेलनात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी भाजपात प्रवेश केला.
प्रशांत कुत्तरमारे यांची विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक अशी ओळख होती. काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आसल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत
भाजपमध्ये प्रवेश केला. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून यापूर्वी मूलचेरा तालुक्यातील ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. नंतर त्यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची माळ पडली. मूलचेरा तालुका हा त्यांचे हा प्रभावक्षेत्र असून या तालुक्यात त्यांची बर्याचपैकी राजकीय ताकत आहे.