नगरपंचायत एटापल्ली सर्व महिलांना सूचना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना

137

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील सर्व महिला वर्गाचे फॉर्म ऑफलाईन भरून ते ऑनलाईन अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून मंगळवार दिनांक १६/०७/२०२४ ते ३१/०८/२०२४ पर्यंत मा.दिपयंती निजान पेंदाम नगराध्यक्षा यांच्या सुचनेनुसार अभियान राबविण्यात येणार आहे. तरी नगरपंचायत एटापल्ली क्षेत्रातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा.

सुमारे १० हजार महिलांना या योजनेचा लाभ होऊ शकतो या दृष्टिकोनातून महिलांना त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये व योजनेचे अर्ज भरण्याचा महिलांचा अनुभव सुखकर व्हावा याकरिता नगरपंचायत एटापल्ली तर्फे मंगळवार पासून अभियान सुरू करत आहे.अशी माहिती व सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार यांनी केले.