जोगीसाखरा जलजिवन मिशन पाणी पुरवठा योजनेचा प्रगतीपथावर #jantechaawaaz#news#portal#

40
प्रतिनिधी//
सरपंच संदिप ठाकुर यांनी केली पाहणी
 जोगीसाखरा – आपल्या गावांचा सवागिक विकास व्हावा या हेतूने ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकाना शुद्ध पाणी मिळावे पाणी टंचाई कायम स्वरुपी नष्ट व्हावी यासाठी  ग्रामपंचायत सरपंच संदिप ठाकुर यांनी
 कसोटीचे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न करुण जल जीवन मिशन अंतर्गत जोगीसाखरा गावाला एक कोटी रुपयांची  स्वतंत्र पाणी योजना मंजूर करण्यात आली या योजनेच्या कामात धुमधडाक्यात बांधकामास सुरुवात करुन आता हे काम पुनता प्रगतीपथावर असल्यामुळे  जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना  राबविली जात
 आहे. या कामाची पाहणी आज  जोगीसाखरा गट ग्रामपंचायत चे सरपंच संदिप ठाकुर  यांनी सुरु असलेल्या विहीर बांधकाम कामाची केली. काम प्रगतीपथावर असल्याने  सरपंच संदिप ठाकुर यानी समाधान मानले .