प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी : तालुक्यातील महागाव येथील सुरेखा येरोजवार यांची काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने ते चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत आहे.येरोजवार यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना बाहेरची औषध व इतर कमांसाठी आर्थिक अडचण भासत होती.
सदर बाब काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यां कडून कळताच त्यांनी चंद्रपूर गाठून नातेवाईकांना भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली तसेच रुग्ण सुरेखा येरोजवार यांना तब्येतीची आस्थेने विचारपूस करून येरोजवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली.
दरम्यान यावेळी कंकडालवार म्हणले कि यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य ते मदत करेन म्हणून येरोजवार कुटुंबियांना मोठा धीर दिला. या आर्थिक मदतीविषयी महागाव येथील येरोजवार कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.







