प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली: दि. 10.07.2024 रोजी मा. अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश खांडेकर साहेब व कार्यकारी अभियंता (प्रशासन) श्री. गाडगे साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाद्वारे सदरील ग्रामसभेत उपस्थित पंधरा गावच्या गावकऱ्यांनी सहभाग घेतला. गावातील उपस्थित ग्रामसेवक सौ. कपूर डेहरिया व सरपंच राकेश कवडो तसेच उपसरपंच ह्यांनी शेतकऱ्यांकडून आवश्यक असलेले कागदपत्रे दहा दिवसामध्ये गोळा करून उपविभाग एट्टापल्ली येथे जमा करत असल्याचे गावकऱ्या समक्ष आश्वासन दिले. सदरील कार्यक्रमात उपकार्यकारी अभियंता श्री. नरेश बुरडकर, सहाय्यक अभियंता श्री. मडावी व कनिष्ठ अभियंता श्री लायनकर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमामध्ये प्रधान मंत्री कुसुम योजना व प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना ह्या बद्दल श्री. बुरडकर ह्यांनी योग्य माहिती दिली.