खांदला येथे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेकडून Hriday Lic HFL प्रकल्पाचे उद्घाटन सोहळा संपन्न

125

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार

#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी:अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत येथे आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेअंतर्गत Holistic Rural Initiative for Development Action and Yield हा प्रकल्प राबविण्यात येत आहे यामध्ये खादला ग्रामपंचायत येथील मरनेली, गोलाकर्जी, चीरे पल्ली, पत्तीगाव, कोत्तागुडंम,रायगट्टा या गावांचा समावेश आहे. या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून दिनांक 28/ 6/2024 रोज शुक्रवार ला प्रकल्प आरंभ सोहळा पार पडला
या कार्यक्रमाचे उद्घाटन आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संयोजक संस्थापक डॉक्टर सतीश गोगुलवार सर कमलापूर राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर राजेश मानकर सर, संस्थेचे डायरेक्टर श्री मुकेश शेंडे सर प्रकल्प समन्वयक रजनी चौधरी खांदला ग्रामपंचायतच्या सरपंच सुमन आला म पेसा समितीचे अध्यक्ष मुकुंदराव सिडाम, कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर संतोष नैताम, कुंभारे सर कृषी व पशु तज्ञ हरिदास कांबळे, प्रभाग समन्वयक प्रकाश सिडम आनंदराव तेलसे, ग्राममित्र अरुण चालूरकर संतोष पोरटेत, दीपा गावडे तसेच 7 ही गावातील महिला, पुरूष मोठया संख्येने सहभागी झाले.
या प्रकल्पांतर्गत जंगलाचा संरक्षण संवर्धन व्यवस्थापन करून गोंन वन उपज आधारित विक्री व्यवस्था उभारून उपजीविका सक्षम करणे तसेच गाव विकास आराखडा तयार करणे शेतीसाठी माती पाणी व्यवस्थापनाची कामे ज्यात शेततळी खोदणे नाल्यावर बांध बनविणे मजगीची कामे , आदी पर्यावरणीय शेती पद्धतीचा वापर पशुधन व्यवस्थापन आरोग्य तपासणी शाळा व अंगणवाडी सुधार सामुदायिक वाचनालय सांडपाणी व्यवस्थापन शेतकरी गट बांधणी, कमी खर्चाची शेती, सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब, परसबाग लागवड, कुकुट पालन, बकरी व्यवस्थापन सहकार्य
ग्रामसभा व बचत गट सक्षमीकरण इत्यादी कामे या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येनार आहे याची संपूर्ण माहिती या कार्यक्रमा अंतर्गत गावकऱ्यांना देण्यात आले