राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली तर्फे तब्बल 5 अपघातग्रसतांना मदत

432

प्रतिनिधी:तेजेश गुज्जलवार

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार

#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

आज दि. 3 जुलै 2024 रोजी सुमारे दुपारी 12 वाजता संकेत पुल्लूरवार यांनी राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे सचिव मनीष ढाली यांना फोन करून एटापल्ली ते कसनसूर मार्गांवर तोडसा नाल्या जवळ अपघात झाल्याचे सांगितले लगेच कश्याचाही विचार न करता मनीष ढाली व राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे अध्यक्ष अनिकेत मामीडवार लगेच त्यांची रुग्णवाहीका घेऊन अपघात स्थळी पोहचले दोन दुचाकी वाहन समोरासमोरून धडक दिली असल्याने एकूण 5 व्यक्ती जखमी झाले त्यामध्ये लक्ष्मण कवडो रा. मोहुर्ली , नागेश पुंगाटी रा. कुद्री , संतोष आलामी व रेखा आलामी रा. नागूलवाडी , अनिल तलांडे रा. पंदेवाही ता. एटापल्ली येथील रहिवासी आहेत सगळ्यांची स्थिती ठीक असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे सोडून देण्यात आले.
सदर रुग्णांना मदत करते वेळी आदित्य चिप्पावार , प्रसंजित करमरकर व आदी नागरिक उपस्थित होते.
ग्रामीण भागात कार्य करणारी ही फॉउंडेशन ग्रामीण भागातील रुग्णांन करिता ठरत आहे देवदूत.