प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
आज दिनांक 30 जून 2024 रोजी सुमारे ४ वाजता लोकमत समाचार चे वार्ताहर आनंद भैय्या बिश्वास यांनी दूरध्वनी द्वारे राजमुद्रा फॉउंडेशन एटापल्ली चे अध्यक्ष अनिकेत मामीडवार यांना संपर्क साधून एटापल्ली टोला येथे एक इसम काम करताना घरावरतून पडल्याचे सांगितले त्याच क्षणी राजमुद्रा फॉउंडेशन चे सचिव मनीष ढाली व अनिकेत मामीडवार लगेच त्यांची रुग्णवाहीका घेऊन घटनास्थळी जाऊन बघताच अपघाती इसम राकेश गोटा रा. एटापल्ली टोला ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील आहे त्याला जबर मार लागलं असल्याने लगेच ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे सोडून देण्यात आले व त्याची स्थिती थोडीफार ठीक होई पर्यंत अनिकेत मामीडवार व मनीष ढाली तिथे उपस्थित होते.
धन्य ती राजमुद्रा फॉउंडेशन पुढेही यांचा हातून अशेच कार्य घडत राहो अशी ग्रामीण वर्गाची इच्छा आहे.