प्रतिनिधी//
रूपेश सलामे
गडचिरोली:-सृष्टी सिलेब्रेशन सभागृह येथे सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था नवेगाव (मुरखेडा) च्या वतीने पोलीस भरतीचे मैदानी चाचणी२०२४ करिता उपस्थित राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना मुप्त जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या जिल्ह्यात गरीब आणि होतकरू असलेले तरुण यांना आर्थिक परिस्थितीमुळे गडचिरोलीमध्ये राहण्याची गैरसोय असताना या संस्थेने ही व्यवस्था केली आहे .
या संस्थेचे अध्यक्ष ज्योती जुमनाके ,सचिव एस .एम. दुर्गे ,कोषाध्यक्ष डी.जे . जुमनाके , समाज सेवक सुरज कोडापे , सामाजिक कार्यकर्ते सतीश कुसराम व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे .या ठिकाणी दररोज ५० ते ६० सुशिक्षित बेरोजगार उमेदवार येऊन या संधीचा फायदा घेतात . असाच फायदा इतर उमेदवारांनी घ्यावा असे संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे . हा उपक्रम पोलीस भरती प्रक्रिया २०२४ ची मैदानी चाचणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहील असे कळविण्यात येत आहे.







